नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या लागल्याने तसेच प्रवाशांची संख्या कमी झाल्याने गेल्या काही दिवसांपासून सिटी लिंकच्या ४० बसच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या होत्या. १ जुलैपासून सिटी लिंकच्या २५० बसेस धावणार असून विद्यार्थी, प्रवाशांच्या संख्येनुसार फेऱ्यांचे नियोजन करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शाळा, महाविद्यालयांना उन्हाळ्याच्या लागलेल्या सुट्ट्या तसेच खाजगी प्रवासी संख्यादेखील कमी झाल्याने झाली होती. दुसरीकडे गुरुअस्तमुळे लग्नाचे मुहूर्तदेखील
नसल्याने ग्रामीण भागात धावणाऱ्या मार्गांवर प्रवासी संख्या कमी झाली होती. याचमुळे तोटा कमी करण्यासाठी सिटी लिंकचे ४० बसेसच्या साधारणतः १२० फेऱ्या कमी केल्या होत्या.
दरम्यान, दहावी-बारावीचे जाहीर झालेले निकाल, तसेच २० जूननंतर शहरातील बहुतांश शाळा, महाविद्यालय सुरू होणार आहेत. त्या दृष्टीने प्रशासनाने बसफेऱ्यांचे फेरनियोजन केले आहे. याच पार्श्वभूमीवर एक जुलैपासून विविध मार्गावर नियमितपणे २५० बसेस धावणार असल्याची माहिती सिटी लिंकच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली