🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: सिटीलिंकची नाशिकरोड ते गिरणारे नवीन बससेवा सुरू

नाशिक। दि. ५ ऑगस्ट २०२५: सिटीलिंकने नाशिकरोड ते गिरणारे असा नवीन बसमार्ग (क्र.२३१) सुरू केला आहे. या सेवेमुळे प्रवाशांना, विशेषतः जे.आय. टी. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. बऱ्याच दिवसांपासून या मार्गावर बससेवा सुरू करण्याची मागणी होत होती, ती आता पूर्ण झाली आहे. सिटीलिंकने केलेल्या अधिकृत सर्वेक्षणानंतर हा मार्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 'सावाना'त शनिवारी (दि. २१) ‘स्वर-सावाना’चे १९ वे पुष्प; गायिका आयेशा मुखर्जी यांचे सादरीकरण

बसचा मार्ग असा: नाशिकरोडहून निघून द्वारका, सिव्हिल हॉस्पिटल, सातपूर, अशोकनगरमार्गे जे.आय.टी. महाविद्यालयाला जाऊन गिरणारेपर्यंत पोहोचेल आणि त्याच मार्गाने परत येईल.

असे असेल बसचे वेळापत्रक: नाशिकरोड ते गिरणारेः सकाळी ८ वा. आणि सकाळी १० वा., नाशिकरोड ते जे.आय.टी. कॉलेज: दुपारी ३ वाजता, जे.आय.टी. महाविद्यालय ते नाशिकरोडः दुपारी ४.३० वा.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790