नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक – पुणे मार्गावरील पळसेगाव भागात भरधाव सीटी लिंक बसने दिलेल्या धडकेत ४१ वर्षीय पादचारी ठार झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात बसचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजी पांडूरंग भोये (४१ रा. बाभुळेश्वर जाखोरी ता.जि.नाशिक) असे मृत पादचारीचे नाव आहे. भोये शनिवारी (दि.२३) रात्री पळसेगावातील इंडियन ऑईल पेट्रोलपंपासमोर नाशिक – पुणे मार्ग ओलांडत असतांना हा अपघात झाला होता.
भरधाव सिटी लिंक बसने जोरदार धडक दिली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या भोये यांचा मृत्यू झाला. याबाबत हवालदार पुंडलीक ठेपणे यांनी फिर्याद दिली असून याप्रकरणी पोलीस दप्तरी बसचालक अजित जयवंतसिंग परदेशी (रा.लेखानगर,जुने सिडको) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.