मनपा वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागरगोजे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. आवेश पलोड पॉझिटिव्ह

corona nashik news

नाशिक (प्रतिनिधी): कोरोना नियंत्रणाची जबाबदारी ज्यांच्यावर मुख्यत: आहे ते महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. आवेश पलोड यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे.

त्यांचा चार्ज डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांच्याकडे देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच पालिकेची वैद्यकीय विभागातील सहाय्यक वैद्यकीय अधिकार्‍यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

आता महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारीच कोरोनाबाधित होत आहेत. मुख्यालयात सतत येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ असल्याने त्यातून हा संसर्ग वाढत आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील कोरोना योध्दा म्हणून ओळख असलेले डॉ. बापूसाहेब नागरगोजे आणि डॉ. आवेश पलोड यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांचे रिपोर्ट गुरुवारी (दि. २५) पॉझिटिव्ह आले.

⚡ हे ही वाचा:  पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे नाशिक येथे 8 डिसेंबर रोजी आयोजन

त्यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचा डोलाराच कोसळतो की काय अशी शंका उपस्थित होत आहे. डॉ. नागरगोजे यांचा चार्ज डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांना देण्यात आला आहे.
आता  महापालिकेतील सर्वच अधिकारी व कर्मचार्‍यांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. नागरिकांशी कायमचा संबंध येत असलेले महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, सुरक्षारक्षक, सफाई कर्मचारी यांना आरटी-पीसीआर करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार १५ मार्चपासून महापालिकेत अधिकारी, कर्मचारी व सुरक्षारक्षकांची आरटी-पीसीआर चाचणी केली जात आहे. शनिवारपर्यंत १९९ अधिकारी, कर्मचारी व सुरक्षारक्षकांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. त्यापैकी १४ जण पॉझिटिव्ह आढळून होते. यात एका सहायक वैद्यकीय अधिकार्‍यासह काही कर्मचारी व अधिकार्‍यांचे वाहनचालक यांचा समावेश आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी भूषण लोंढेला नेपाळ बॉर्डर येथून अटक !

शहरातील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने करोना नियंत्रणाचे मोठे आव्हान वैद्यकीय विभागासमोर उभे ठाकले आहे. त्यासाठी वैद्यकीय विभागातील अधिकारी, डॉक्टर दिवस-रात्र कार्यरत असतानाच आता वैद्यकीय अधीक्षक, अधिकारी, सहायक वैद्यकीय अधिकारी यांचा अहवालदेखील पॉझिटिव्ह आल्याने वैद्यकीय विभागाला धक्का बसला आहे. शहरातील करोना नियंत्रणासाठीच्या उपाययोजनांची जबाबदारी सध्या या वैद्यकीय अधिकार्‍याकडे आहे. मुख्य वैद्यकीय अधिकार्‍यांसह अन्य वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांच्या संपर्कात हा अधिकारी आल्याने वैद्यकीय विभागाचे टेन्शन वाढले आहे. संबंधित अधिकार्‍यास लक्षणे नसली, तरी ते सध्या होम क्वारंटाइन झाले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790

here