नाशिक (प्रतिनिधी): राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वत: त्यांच्या ट्वीटर अकाउंटवरून याबाबत माहिती दिली आहे. “माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात अलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.” असे त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हंटले आहे.
छगन भुजबळ यांच्या उपस्थित काल नाशिक जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती. संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांसोबतही छगन भुजबळ यांनी बैठक घेतली आहे.
छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कालच आमदार सरोज अहिरे यांच्या लग्नाला हजेरी लावली होती. या लग्नाला उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारदेखील उपस्थित होते. भुजबळ यांना कोरोनाची लक्षणे आढळल्याने कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.