नाशिक। दि. २९ जुलै २०२५: नाशिकमधील ट्रॅक्शन मशिन वर्कशॉप, मध्य रेल्वे येथे कार्यरत वरिष्ठ विभाग अभियंता (गुणवत्ता तपासणी) विजय चौधरी याला ₹१५,००० लाच घेताना केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अटक केली आहे. ही रक्कम खाजगी कंपनीकडून पुरवण्यात आलेल्या लाकडी पॅकिंग वेजेसच्या गुणवत्तेचा अहवाल देण्यासाठी मागितली गेली होती, अशी माहिती सीबीआय अधिकाऱ्यांनी दिली.
या प्रकरणी नाशिकमधील खाजगी कंपनीच्या मालकाने तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, वरिष्ठ अभियंता व्ही. के. चौधरी यांनी खरेदी आदेशानुसार पुरवठा झालेल्या लाकडी साहित्याच्या गुणवत्ता तपासणी अहवालासाठी ₹१५,००० लाचेची मागणी केली होती.
त्यानंतर सीबीआयने सापळा रचून चौधरी यांना तक्रारदाराकडून लाच घेताना रंगेहात पकडले. यानंतर चौधरी यांना अटक करण्यात आली. त्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानी झडती घेण्यात आली असून त्यावेळी काही महत्त्वाचे कागदपत्रे आणि पुरावे जप्त करण्यात आले आहेत. सीबीआयकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
![]()

