वाहतूक पोलिसांकडून अधिसूचना जारी
नाशिक (प्रतिनिधी): जुने सीबीएस ते कॅनडा कॉर्नर सिग्नल रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे. या रस्त्यावर एकेरी वाहतूक आणि पर्यायी प्रवेश बंद करण्यात येणार आहे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
या मार्गांवर प्रवेश बंद: कॅनडा कॉर्नर सिग्नल, शरणपूररोडने सीबीएस सिग्नलकडे, राजीव गांधी भवन, टिळकवाडी सिग्नलमार्गे जाणारी, सिव्हिल हॉस्पिटल, ठक्कर बाजारकडून किशोर सुधारालय, मेळा बसस्थानकमार्गे सीबीएसकडे येणारी, जलतरण तलाव सिग्नलकडून रामायण बंगला, सीबीएसकडे येणारी, राका कॉलनी गार्डनकडून सीबीएसकडे येणारी, कुलकर्णी गार्डन, सीबीएसकडे येणारी, ठक्कर बाजाराकडून कुलकर्णी गार्डनकडे येणारी, नवीन पंडित कॉलनीकडून, राका गार्डन, सीबीएसकडे येणारी, जुनी पंडित कॉलनीकडून लेन नंबर १, २, ३, टिळकवाडी सिग्नलमार्गे सीबीएसकडील वाहतूक बंद.
पर्यायी मार्गः कॅनडा कॉर्नरकडून शरणपूररोडने सीबीएस सिग्नलकडे जाणारी वाहतूक कॅनडा कॉर्नर, जुना गंगापूरनाका, मॅरेथॉन चौक, अशोकस्तंभमार्गे किंवा कॅनडा कॉर्नर ते शरणपूर सिग्नल, मायको सर्कल, भवानी चौक, जलतरण तलाव सिग्नल, मोडक सिग्नल, त्र्यंबकनाकामार्गे इतरत्र जाईल.