नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या सातपूर येथे नंदिनी नदी पुलावरुन मध्यरात्री एक कार पुलावरुन थेट नंदिनी नदी पात्रात पडल्याची घटना घडली आहे.
कार चालकाचा ताबा सुटल्याने ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री ही घटना घडल्यामुळे सुरुवातीला कुणाला काही कळाले नाही. सकाळी मात्र ही घटना समोर आली.
सातपूर मळे परीसरातील दादोबा पुलावरून ही गाडी थेट नंदीनी नदी पात्रात पडली. रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. MH 15 HY 9576 ही कार ही कार मळे परीसरातून येत असतांना नंदीनी नंदीवरील दादोजी जाधव या पुलावर आली. त्यावेळेस चालकाचा ताबा सुटल्याने गाडी थेट नंदीनी नदी पात्रात पडली.
या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून कारचे मोठे नुकसान झाले आहे. ही कार नदी पात्रात गाडी पडल्याचे कळाल्यानंतर नागरीकांनी एकच गर्दी केली. सातपूर पोलिसांना घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली आहे.