नाशिक: रो-हाऊसचा कडीकोयंडा तोडून साडेसात लाखांची घरफोडी!

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): अमृतधाम परिसरातील अयोध्यानगरीत बंद रो-हाऊसचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी  ७ लाख ६० हजारांचे सोन्याचे दागदागिने चोरून नेत घरफोडी केली. तर, यासह चोरट्यांनी तीन घरफोड्या करीत तब्बल १० लाख ३८ हजार ८०० रुपयांचे सोन्याचे दागदागिने चोरून नेले आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: ऑनर किलिंग प्रकरणी सुप्रीम कोर्टात आरोपीला २० वर्षे कारावास

अरविंद गोविंद आहिरे (रा. जानकी वल्लभ सोसायटी, अयोध्यानगरी, अमृतधाम, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी (ता. ३०) ते बाहेर गेले असता, भरदिवसा दुपारी एक ते चार वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद दाराचा कडीकोयंडा तोडला. त्यानंतर चोरट्यांनी बेडरुममधील लाकडी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, रोकड, टीव्हीचा सेटअप बॉक्स असा ७ लाख ६० हजारांचा ऐवज चोरून नेला.

हे ही वाचा:  महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: नाशिक जिल्ह्यात ५० लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

यात ६० हजारांची सोन्याची पोत, ६० हजारांचा राणी हार, १ लाख ३५ हजारांचा सोन्याच्या तीन चैन, ३० हजारांची अंगठी, ४५ हजारंची सोन्याची पोत, ७ हजार ५०० रुपयांची अंगठी, ४५ हजारांची मंगळसूत्र, ६० हजारांची सोन्याची शॉर्ट पोत, १ लाख ८० हजारांची सोन्याच्या चार बांगड्या, ४५ हजारांचे कानातील टॉप्स, २४ हजारांची नथ, १५ हजारांची सोन्याचे वेल. ३० हजारांची सोन्याची अंगठी, २० हजारांची रोकड असा ऐवज चोरीला गेला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३९१/२०२४)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790