‘नाफेड’ला साडेपाच कोटींचा गंडा; १५०० टन कांद्याचा परस्पर केला सौदा !

नाशिक (प्रतिनिधी): ‘नॅशनल अ‍ॅग्रिकल्चरल को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया’ (नाफेड), आणि नाशिक जिल्ह्यातील फेडरेशनकडून सुमारे १,५८९ टन इतका कांदा ३५ रुपये दराने खरेदी करून बाजारात चढ्या दराने विक्री करत नाफेडला साडेपाच कोटींचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  राष्ट्रीय मतदार दिवस: राज्यस्तरीय कार्यक्रमानिमित्त नाशिकला आज (दि. २५) विविध कार्यक्रम

गोवा मार्केटिंग को-ऑपरेटिव्ह फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक संशयित काशिनाथ नाईक यांच्याविरुद्ध नाफेडने दिलेल्या फिर्यादीवरून कांद्याच्या घोटाळ्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाईक यांनी नाफेडकडील कांदा परस्पर नाईक याने २२ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर २०२४ दरम्यान परस्पर विक्री करत जनतेची व नाफेड कार्यालयाची फसवणूक केली. द्वारका सर्कल येथील नाफेड कार्यालयात गंडा घातला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्या (दि. २६) विविध कार्यक्रमांचे आयोजन

नाफेडकडे सुमारे ३५ रुपये प्रतिकिलो दराने १ हजार ५८९ टन कांद्याचा नाईकने अपहार करीत त्याची बाजारात चढ्या दराने विक्री करीत स्वतःचा आर्थिक फायदा करत नाफेडला एकूण ५ कोटी ५६ लाख २१ हजार १६० रुपयांना गंडा घातल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जयंत रमाकांत कारेकर (५८, रा. नाशिकरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790