नाशिक (प्रतिनिधी): येथील दारणाकाठच्या भगूरसह दोनवाडे व राहुरी शिवारात बिबट्याचा मुक्त संचार असून सांगळे मळ्यामध्ये बिबट्याचे दर्शन झाल्याने या भागातील शेतकऱ्यांनी पिंजरा लावण्याची मागणी वनविभागाकडे केली आहे. देवळाली कॅम्प, भगूर, नानेगाव, राहुरी, दोनवाडे, लहवित, लोहशिंगवे, वंजारवाडी या दारणा नदीकाठच्या गावांमध्ये बिबट्यांचा नेहमीच मुक्त संचार असतो.
काही बिबटे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंदही झाली आहे मात्र काही बिबटे दारणाकाठच्या परिसरात मुक्त संचार करत आहेत. दोनवाडे शिवारातील सांगळे वस्तीजवळ गेल्या तीन-चार दिवसांपासून रात्रीच्या सुमारास बिबट्याचा मुक्त संचार होत असून त्यामुळे नागरिक व शेतकरी धास्तावले आहे.
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा त्वरित लावावा, अशी मागणी राहुल सांगळे, मंगेश सांगळे, विष्णू सांगळे, संपत पवार शेतकऱ्यांनी केली आहे.