नाशिक (पप्रतिनिधी): कॅनडाहून नाशिक मध्ये कामानिमित्त आलेल्या 55 वर्षीय व्यक्तीला ताप येणे, दम लागणे, खोकला, डोकेदुखी ही लक्षणे असल्याने ते अपोलो हॉस्पिटल नाशिक मध्ये डॉ. राजश्री धोंगडे यांच्याकडे तपासणीसाठी आले, रक्ताच्या तपासण्या आणि सिटीस्कॅन केल्यावरती सदर व्यक्तीला निमोनिया झाल्याचे निष्पन्न झाले, प्रकृती खालावल्याने अतिदक्षता विभागात दाखल केले गेले.
रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते, रुग्णाला व्हेंटिलेटर सपोर्ट देऊन आणि औषधोपचार करून देखील रुग्णाची प्रकृती खालावत होती, डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांशी ECMO प्रक्रियेबद्दल चर्चा केली आणि नातेवाईकांनी देखील लगेचच होकार दिल्याने ECMO प्रक्रिया सुरू करण्यात आली, आठ दिवस ECMO मशीन द्वारे रुग्णावर उपचार सुरू ठेवण्यात आले, या ट्रिटमेंट ला रुग्णाचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्याच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली , यानंतर ECMO प्रक्रिया थांबवून रुग्णाचे व्हेंटिलेटर देखील काढून रुग्णाला ऑक्सिजन सपोर्ट शिवाय रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आले.
यावेळी बोलताना अपोलो हॉस्पिटलच्या फिजिशियन डॉ. राजश्री धोंगडे म्हणाल्या की, “ज्या रुग्णांना फुफुसाचा किंवा हृदयाचा गंभीर आजार आहे आणि व्हेंटिलेटर लावून देखील शरीराला ऑक्सिजन पुरवठा होत नसेल तर ECMO प्रक्रिया हा एक उत्तम पर्याय आहे. या प्रक्रियेत ECMO मशीनद्वारे शरीरातील रक्ताला कृत्रिमरीत्या ऑक्सिजन पुरवठा करून परत शरीरात पाठवले जाते रुग्णाला पूर्णपणे व्हेंटिलेटर वर अवलंबून राहण्याची गरज नसते आणि यामुळे व्हेंटिलेटर मुळे फुफुसांना होणारी इजा सुद्धा कमीत कमी होते, सदर प्रक्रिया आर्थिक दृष्ट्या महाग तर आहे आणि याचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात परंतु तज्ञ डॉक्टरांची टीम 24 तास कार्यरत असल्याने अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया सुलभपणे पार पडू शकते. भविष्यात जर या एकमेव प्रक्रियेचा खर्च कमी झाल्यास सर्वसामान्य रुग्णांना देखील याचा फायदा होऊ शकतो.”
अपोलो हॉस्पिटल्स ते युनिट हेड अजित झा म्हणाले की, “ECMO प्रक्रिया ही अवघड तसेच गुंतागुंतीची आहे अपोलो हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या आधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी आणि निष्णात डॉक्टरांची टीम, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ, सुसज्ज अतिदक्षता विभाग हे सर्व काही एका छताखाली उपलब्ध असल्याने अशा अवघड प्रक्रिया यशस्वी करता येतात अतिदक्षता विभागातील डॉ. प्रवीण ताजणे, डॉ.अतुल सांगळे, डॉ.अमोल खोलमकर डॉ.राहुल भामरे, डॉ.तुषार खैरे , डॉ.पंकज खांगल, डॉ.मृणाल चौधरी, रेडिओलॉजिस्ट डॉ. हर्षल धोंगडे, हृदयविकार तज्ञ डॉ. निर्मल कोलते यांनी अथक परिश्रम घेतले, अशा क्रिटिकल केस मध्ये टीम वर्क सगळ्यात महत्त्वाचे असते.”