नाशिक: भरधाव दोन दुचाकींमध्ये समोरासमोर धडक, पल्सरस्वार तरूण ठार

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): समतानगर ते उपनगर नाका दरम्यान भरधाव दोन दुचाकींमध्ये झालेल्या समोरासमोरील धडकेत पल्सरस्वार तरूण ठार झाला.

या अपघातील दुसरा मोटारसायकलस्वारही जखमी झाला असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: छतावर सौर ऊर्जा निर्मितीसाठी महावितरणतर्फे मोफत नेट मीटर

वतन दादासाहेब पावरा (२२ रा. दौलत बंगला,उपनगर) असे मृत पल्सरस्वाराचे नाव आहे. पावरा शनिवारी (दि.९) रात्री आपल्या पल्सर दुचाकीवर समतानगरकडून उपनगर नाक्याच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला.

हे ही वाचा:  नाशिक: शेअर्स ट्रेडिंगचे आमिष दाखवून लिंक पाठवत ३९ लाखांना गंडा

पल्सर आणि युनिकॉर्न या दोन दुचाकींमध्ये समोरासमोर धडक झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या अपघातात दुसरा मोटारसायकल चालकही जखमी झाला असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक उंडे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790