नाशिक (प्रतिनिधी): शहरात दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन महिलांचा मोटारसायकलीवरून तोल जाऊन पडल्याने दुखापत झाल्यामुळे मृत्यू झाल्याच्या नोंदी पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आल्या आहेत.
अपघाताचा पहिला प्रकार भाभानगर येथे घडला. संगीता संजय जोशी (वय १८, रा. उत्कर्ष हौसिंग सोसायटी, भाभानगर) या दि. २९ मार्च रोजी राहत्या घरी सोसायटीच्या आवारात स्वतःच्या स्कूटी गाडीवरून पडल्याने त्यांच्या खुब्याला दुखापत झाली. त्यांचे ऑपरेशन होऊन घरी असताना त्यांची हालचाल होत नसल्यामुळे त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
अपघाताचा दुसरा प्रकार म्हसरूळ परिसरात घडला. हिराबाई लक्ष्मण तांदळे (वय ७४, रा. दत्तनगर, पेठ रोड, नाशिक) या दि. २० मार्च रोजी नातू रोहन तांदळे याच्यासोबत मोटारसायकलीने आसाराम बापू पुलाजवळून जात होत्या. मोटारसायकलीवरून त्यांचा तोल जाऊन पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांचा मुलगा सुनील तांदळे यांनी हिराबाई तांदूळ यांना औषधोपचारासाठी श्री गुरुजी हॉस्पिटलमार्फत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना तपासून त्यांना मृत घोषित केले.
![]()


