नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): केटीएचएम ते राजीवगांधी भवन मार्गावर भरधाव दुचाकी घसरल्याने चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. जखमी दुचाकीस्वारावर आडगाव येथील मेडिकल कॉलेज रूग्णालयात उपचार सुरू होते. याबाबत सरकारवाडा पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रविंद्र कैलास खंडारे (३२ रा. मोगलनगर,अंबड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. खंडारे गेल्या गुरूवारी (दि. १४) रात्री केटीएचएम कॉलेजकडून राजीवगांधी भवनच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता.
भरधाव दुचाकी घसरल्याने ते पडले होते. या अपघातात त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यानंतर त्यांना अधिक उपचारार्थ आडगाव येथील मेडिकल कॉलेज येथे हलविण्यात आले होते. उपचार सुरू असतांना मंगळवारी (दि.१९) त्यांना डॉ. विनीत पाटील यांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार साबळे करीत आहेत.