हृदयद्रावक : गंगापूररोडवरील उच्चभ्रू वसाहतीमधील इमारतीवरून नववीच्या मुलाची आत्महत्या

शाळेत जाण्यासाठी निघाला अन् दहाव्या मजल्यावरून घेतली उडी

नाशिक (प्रतिनिधी): इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नववीत शिकणारा आदित्य श्रीकांत भांडारकर (१४, रा. अर्चित झोडियाँक अपार्टमेंट, सिरिन मॅडोज) हा शाळेत जाण्यासाठी गणवेश परिधान करून बुधवारी (दि.२०) बाहेर पडला; मात्र आदित्यने लिफ्टमधून खाली येण्याऐवजी दहाव्या मजल्यावरून उडी घेतली. यामुळे त्याच्या डोक्याला जबर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.

आदित्य शांत अन् अभ्यासात हुशार:
■ आदित्य हा शांत स्वभावाचा मुलगा होता. तो शहरातील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत होता. त्याचे वडील हे कापड व्यावसायिक आहेत.

■ अशाप्रकारचे पाऊल का उचलले? हे कोणालाच समजू शकलेले नाही. आदित्यच्या पश्चात आई, वडील, बहीण आहे. मुलाच्या अकाली मृत्यूने भांडारकर दाम्पत्यावर मोठा आघात झाला.

■ आदित्य हा ताणतणावाखील होता का? याचा तपासही पोलिसांकडून करण्यात येणार आहे. अपार्टमेंटच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेजचीही पोलिसांनी पाहणी केल्याचे समजते.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: आजपासून बेशिस्त रिक्षांवर पोलिसांची 'ऑटो रिक्षा शिस्त मोहीम'

या घटनेने संपूर्ण गंगापूररोड परिसर हळहळला. आदित्यने अशाप्रकारे टोकाचे पाऊल का उचलले? याचा तपास आता पोलिस करत आहेत. गंगापूर रोडवरील उच्चभ्रू भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिरीज मेडोजमधील झोडियॉक इमारतीत श्रीकांत भांडारकर हे कुटुंबासोबत राहतात. त्यांच्या घरात पत्नी, मुलगा आदित्य व पाच वर्षांची मुलगी वास्तव्यास आहेत. आदित्यने बुधवारी शाळेत जाण्यासाठी नेहमीप्रमाणे तयारी केली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: हॉटेल गोळीबार प्रकरणी लोंढे टोळीचा फरार संशयित जेरबंद

शहरातील एका नामांकित शाळेत तो नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता. आदित्यने खाली न येता टेरेसवर दप्तर काढून ठेवत उडी घेतली, अशी माहिती गंगापूर पोलिसांनी दिली. ही घटना सकाळी सुमारे साडेसात वाजेच्या सुमारास घडली. येथील सुरक्षारक्षकांच्या हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी धाव घेतली. यावेळी आदित्य हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याचे काका अजय भांडारकर (६०) यांनी जखमी अवस्थेत त्याला शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: फूटपाथवर झोपलेल्या व्यक्तीचा वाहनाखाली मृत्यू

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यावेळी तपासून विद्यार्थ्यास मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली असून पुढील तपास गंगापूर पोलिस करत आहेत. या घटनेने आदित्यचे आई, वडील यांना जबर मानसिक धक्का बसला आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here