मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू तर आठ जण जखमी

नाशिक (प्रतिनिधी): मुंबई-नाशिक महामार्गावरील ट्रेलर आणि टॅक्सीचा भीषण अपघात झाला. खडवली फाट्याजवळ रस्ता क्रॉस करत असताना भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेलरने टॅक्सीला जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये ४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ८ जण जखमी झाले.

थरकाप उडवणारी ही घटना मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. अपघातानंतर स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी पडघा येथील ग्रामीण रूग्णालयात पाठवण्यात आले असून जखमींना खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सकाळी ८ वाजेच्या सुमारास टॅक्सी रस्ता क्रॉस करत असताना महामार्गावर भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेलरने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, टॅक्सी सुमारे ६० फूट दूर फेकली गेली.

या अपघातात ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे तर ८ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, या अपघाताचा पुढील तपास पडघा पोलिस करत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790