ज्या तारखेला ड्युटीवर जायचं ठरलेलं, त्या दिवशी अखेरचा निरोप; नाशिकच्या जवानाचा अपघाती मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): भारतीय सैन्य दलात सेवा बजावणाऱ्या जवानाचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील धानोरे येथील श्रीराम राजेंद्र गुजर (वय २४) यांचे निधन झाले. श्रीराम गुजर हे सुट्टीवर गावी आले होते. शिर्डी येथून साईबाबाचे देवदर्शन करून सोनेवाडी (ता. कोपरगाव जि. अहमदनगर) येथे नातेवाईकांकडून घरी येत असताना सिन्नर-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर पाथरे (ता. सिन्नर) येथे पल्सर दुचाकी गाडीचा अपघात झाला.

धानोरे येथील रहिवासी असलेले भारतीय सैन्य दलातील जवान श्रीराम राजेंद्र गुजर (२४) हे सुटीवर गावी आले असताना शिर्डी येथून साईबाबाचे देवदर्शन करून सोनेवाडी (ता. कोपरगाव, जि. अहमदनगर) येथे नातेवाईकांकडून घरी येत असताना दुचाकी गाडीचा अपघात झाला.

ही घटना १६ जुलैला दुपारी अडीचच्या सुमारास सिन्नर-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर पाथरे (ता.सिन्नर) येथे घडली. श्रीराम यांच्या निधनामुळे गावावर शोककळा पसरली असून मंगळवारी (ता.१८) सकाळी अकराला धानोरे येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

आसाम (गुवाहाटी) येथे भारतीय सैन्य दलात शिपाई जहाज ऑपरेटर म्हणून कर्तव्यावर होते. पंचवीस दिवसांपूर्वी सुटीवर आलेले श्रीराम राजेंद्र गुजर शिर्डी येथून देवदर्शन करून नातेवाईकांकडून घरी जाण्यासाठी निघाले होते. त्यांच्या (एमएच १५. एचए ९००६) दुचाकीला समोरून येणाऱ्या  दुचाकीने जोरदार धडक दिली.

या अपघातात श्रीराम गंभीर जखमी झाले. श्रीराम यांच्या सोबत असलेला मावसभाऊ अक्षय ऊर्फ बबलू पांडुरंग जावळे (२५. रा. सोनगाव, ता. कोपरगाव) यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर पाथरेचे ग्रामस्थ व पिंपरवाडी टोल नाका मदत पथकाने श्रीराम व अपघातग्रस्तांना शिर्डी येथे साई संस्थांच्या सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादम्यान श्रीराम यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे आजोबा संतू, आई अनिता, शेतकरी वडील राजेंद्र, भाऊ नितिन, बहीण प्रियंका असा परिवार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group