मुंबई – आग्रा महामार्गावर दोन वाहनांची धडक; पाच जण जखमी

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): मुंबई – आग्रा महामार्गावर दोन वाहनांची समोरसमोर धडक झाल्यामुळे झालेल्या अपघातात पाच ते सात जण जखमी झाले आहे. दुपारी दीड वाजेच्या सुमरास हा अपघात झाला. मुंबईकडून नाशिककडे कोंबड्या वाहतूक करणारा आयशर व मॅक्स इमेज या वाहतूक गाड्यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले.

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थेच्या रुग्णवाहिकेने या जखमींना तात्काळ रुग्णलयात दाखल करण्यात आले. या अपघातात निर्मला नारायण पवार (६०) रा. खोडाळा, यशवंत गणेश पवार (१०) यांना जास्त मार लागला.

या अपघातात आयशर एमएच १५ जीव्ही ६१५० व मॅक्स इमेज तेवीस ३२६१ या दोन्ही गाड्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे. सकाळीच दिंडोरी येथील तरुणांच्या दुचाकी वाहनांचा अपघात झाला. त्यात तो गंभीर जखमी झाला. आता या अपघाताला काही तास उलटत नाही तोच हा अपघात समोर आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790