सेवा हक्क कायद्यानुसार वीज ग्राहकांना सेवा द्यावी – दिलीप जगदाळे

नाशिक। दिनांक: ३० एप्रिल २०२५ (प्रतिनिधी): राज्यातील जनतेला विविध नागरी सेवा विहित कालावधीत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने सेवा हक्क कायदा २०१५ अंमलात आणला आहे. याची प्रभावीपणे महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अंमलबजावणी करण्याचे निर्देश महावितरण कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांनी आज बुधवारी दिले.

सेवा हक्क पंधरवडा निमित्ताने महावितरण कडून विविध सेवा वीज ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी त्यांनी कोकण परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेतली. यावेळी त्यांनी निर्देश दिले.
वीज सेवा विहित कालावधीत वीज ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात यावी, या कामी हयगय करणार्‍या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

👉 हे ही वाचा:  नाशिक: मुलींच्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेत कंत्राटी पद भरतीसाठी 18 जुलै रोजी मुलाखतीचे आयोजन

वीज ग्राहकांच्या सोयीसाठी राज्य शासनाने महावितरण पोर्टल सुरू केले आहे. या माध्यमातून प्राप्त तक्रारींचे निराकरण विहित कालावधीत करण्यात येणार आहे. या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांनी केले. बैठकीला प्रादेशिक विभागातील मुख्य अभियंते चंद्रमणी मिश्रा, अनिल डोये, सुंदर लटपटे व इब्राहिम मुलाणी यांच्यासह विविध मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंते उपस्थित होते. तत्पूर्वी प्रादेशिक कार्यालयात सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांनी तसेच नाशिक परिमंडळ कार्यालयात मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवा पंधरवडा निमित्ताने शपथ दिली.

👉 हे ही वाचा:  रेल्वेच्या 74 हजार डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मंजुरी

राज्य शासनाच्या सेवा हक्क कायदयात महावितरणच्या काही सेवांचा समावेश करण्यात आला आहे.या सेवा वीज ग्राहकांना विहित मुदतीत उपलब्ध करून देण्यात यावी, असे आवाहन जगदाळे यांनी केले. यावेळी अधीक्षक अभियंते नीलकमल चौधरी, कैलास दुधबर्वे, मोहन काळोखे, उपमहाव्यवस्थापक योगेश खैरनार व सहाय्यक महाव्यवस्थापक हवीषा जगताप, उपस्थित होते. कोकण प्रादेशिक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या सर्व परिमंडळ आणि मंडळ कार्यालयात याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790