१५ ऑक्टो्बरपासून चित्रपटगृहे उघडण्यास परवानगी पण…

नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या ७ महिन्यांपासून बंद असलेली देशातील चित्रपटगृहे अखेर १५ ऑक्‍टोबरपासून उघडण्यात येणार असून, त्यासंदर्भात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून मंगळवारी (दि.६ ऑक्टोबर) रोजी स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) जाहीर करण्यात आली आहे. कंटेनमेंट झोन वगळता इतर भागांमध्ये ५०% क्षमतेने मल्टिप्लेक्स आणि सिनेमा हॉल सुरू केले जाणार आहेत.

तर चित्रपटगृहातील बैठक व्यवस्थेमध्ये दोन लोकांमधील आसन रिकामे ठेवावे लागणार असून, ज्या आसनावर प्रेक्षक बसेल त्याच्या अगदी मागची जागासुद्धा रिकामी ठेवावी लागणार आहे. इतर आसनांवर नॉट टू बी ऑक्युपाईड लिहावे लागेल. व त्यावर टेप किंवा स्पष्ट दिसेल अशी खुण करावी लागेल. एसी २४ ते ३० अंशावर ठेवावा लागेल. प्रेक्षकांनी तसेच चित्रपटगृहातील कर्मचाऱ्यांनी देखील मास्क लावणे बंधनकारक असेल. तसेच शोच्या आधी आणि तो संपल्यानंतर प्रेक्षकांना कोरोनाच्या जागरूकतेसाठी एक मिनिटाचा लघुपटही दाखवावा लागेल, असे एसओपी जारी करताना माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले.

हे ही वाचा:  नाशिक शहरात पावसाची हजेरी, त्र्यंबकेश्वरला काही मिनिटांत रस्ते पाण्याखाली...

एसओपीनुसार लक्षणे नसलेल्या प्रेक्षकांनाच प्रवेश देण्यात यावा, तसेच थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात यावी, एन्ट्री-एक्झिट पॉईंट व कॉमन एरियामध्ये टच फ्री मोड हॅण्ड सॅनिटायझरची व्यवस्था करावी, जर कोणी नियमांचे उल्लंघन करत असेल त्यास कठोरपणे वागणूक द्यावी, हॉलबाहेर कॉमन एरियामध्ये ६ फूट अंतरासाठी जमिनीवर मार्कर लावण्यात यावे. तसेच चित्रपटांच्या तिकिटांचे बुकिंग दिवसभर चालू ठेवून, अॅडव्हान्स बुकिंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी. त्याचप्रमाणे आरोग्य सेतु अॅपच्या वापरावर देखील जोर देण्यात येत‌ आहे. तर दुसरीकडे सावधगिरी म्हणून इंटरव्हलचा कालावधी नागरिक रांगेत जावे म्हणून वाढवला जाऊ शकेल.

हे ही वाचा:  नाशिक: आईचंच काळीज ते! लेकराचा मृत्यू झाल्याचं कळलं, आईनेही प्राण सोडला

तसेच ॲक्सेस पॉईंट, ऑनलाइन सेल्स पॉईंट, लॉबी व वॉशरूम यासारख्या भागात लोकांना संसर्गापासून वाचवण्याच्या पद्धतीही सांगण्याची व्यवस्था करावी लागेल. शो संपल्यानंतर संपूर्ण हॉल सॅनिटाइज करण्यात येईल. तसेच चित्रपटगृहात अन्नपदार्थ व पेय पदार्थ पुरवले जाणार नाहीत. शिवाय फक्त सीलबंद खाद्यपदार्थांनाच परवानगी असेल.त्यातही ऑनलाइन पेमेंट ला प्रोत्साहन द्यावे लागेल.

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790