Monsoon Forecast : राज्यात पावसाचा खेळ; मुंबई, पुणे तापणार तर ‘या’ २४ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात मान्सून उशिराने दाखल झाला असला तरी कमी वेळेत पावसाने सरासरी गाठली आहे. महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यानंतर आता मात्र पावसाची उघडीप पाहयला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोकणाला रेड अलर्ट देण्यात आला होता.

मात्र आता कोकणासह मुंबई, पुण्यातही पावसाचा जोर कमी होणार असून विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मात्र अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: पाच लाखांची खंडणी मागत उकळले ५० हजार; एकाला अटक

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, राजगड, पुणे, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पुढचे काही दिवस पावसाचा जोर कमी असेल असा अंदाज आहे. तर हवामान खात्याकडून राज्यातील २४ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

कोकण विभागात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे तापमानामध्ये वाढ जाणवू लागली असून, मुंबईत आठवड्याची सुरुवात उकाड्याने झाल्याची भावना मुंबईकरांनी सोमवारी व्यक्त केली.

👉 हे ही वाचा:  नाशिक: भरधाव बसच्या धडकेत दोघांचा मृत्यू; एक जखमी

या आठवड्यात मुंबईत फारसा पाऊस नसल्याने उकाड्याची जाणीव सहन करायला लागेल, अशी शक्यता आहे. मात्र ही तापमानवाढ फार नसेल, असा अंदाज आहे. ठाणे जिल्ह्यातही पुढील पाच दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम सरींचीच शक्यता आहे. या तुलनेत दक्षिण कोकणाच्या तुरळक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने राज्यात पुढील चार ते पाच दिवस पाऊस संमिश्र राहील, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे उकाडा जाणवण्याची शक्यता आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: एम.डी. ड्रग्ज विक्री प्रकरणी दोघांना अटक; गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई !

या २४ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता…:
हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नाशिक, नंदूरबार, धुळे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून या वेळी वादळी वारेही वाहतील.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790