मोठी बातमी: यंदा पाऊस 106 टक्के बरसणार, IMD चा पहिला अंदाज !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): या वर्षी देशात मान्सून सरासरी राहण्याची शक्यता आहे. संपूर्ण पावसाळ्यात 106 टक्के पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सोमवारी (15 एप्रिल) पावसाचा अंदाज वर्तवत ही माहिती दिली. भारतीय हवामान विभागाने हा पहिला अंदाज वर्तवला आहे.  यंदा मान्सून सामान्यपेक्षा अधिक राहणार आहे.

महापात्रा म्हणाले, यंदा सामान्यहून अधिक पावसाचा अंदाज आहे.  5 जून ते 30 सप्टेंबर दरम्यान 106 टक्के पाऊसाचा अंदाज आहे. यंदा सामान्य पेक्षा चांगली परिस्थिती आहे. 8 जून पर्यंत मान्सून येण्याची स्थिती आहे. अल निनोची परिस्थिती सध्या मॉडरेट आहे. पावसाळा सुरू झाल्यावर अल निनोचा प्रभाव संपला असेल.

अल निनो चा प्रभाव कमी होतो आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाची प्रतिक्षा असते. सगळे शेतकरी नेमका हवामान विभागाचा काय अंदाज येईल याची वाट बघत असतात. अखेर हवामान विभागाचा अंदाज आज जाहीर झाला आहे. दरम्यान हा भारतीय हवामान विभागाचा पहिला दिर्घकालीन अंदाज आहे. पुढचा सुधारीत पावसाचा अंदाज हा मे महिन्याच्या शेवटी वर्तवण्यात येणार आहे. त्यानंतर मान्सूनसंदर्भातील चित्र आणखी स्पष्ट होणार आहे. 

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790