नाशिक: बालगृहे अनाथ मुलांना सकारात्मक ऊर्जा देण्याचे काम करतात: अदिती तटकरे

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): अनाथ झालेले, एखाद्या गुन्ह्यात दोषी ठरलेले किंवा नैसर्गिक आपत्तीत हरवलेले अशा मुलांचे पुनर्वसन निरीक्षण व बालगृहात होत असते. परिस्थितीने पोरकं केल्यानंतर बालगृहांसारख्या संस्था मुलांना मायेचा आधार देऊन सकारात्मक ऊर्जा देण्याचे काम करतात, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले.

उंडवाडी रोड येथील निरीक्षण व बालगृहातील सभागृह व संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार जयंत जाधव, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य सायली पालखेडकर, महिला व बाल विकास विभागाचे उपायुक्त चंद्रशेखर पगारे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सुनील दुसाने, बाल सरंक्षण अधिकारी समीरा येवले, निरीक्षणगृह व बालगृहाचे मानद सचिव चंदुलाल शाह यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, बालगृहातील मुले मुली उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शासनमान्य ग्रंथ यादी निवडीकरिता प्रकाशित ग्रंथ 28 फेब्रुवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन

महिला व बालविकास मंत्री तटकरे म्हणाल्या की, अनाथ मुलांसाठी मुला-मुलींच्या निरीक्षणगृह व बालगृहाचे मानद सचिव चंदुलाल शहा यांचे कार्य नक्कीच प्रेरणादायी आहे. गेल्या काही वर्षापासून निवारासाठी अधिक जागा मिळाली पाहिजे यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे लोकवर्गणीतून जमा केलेल्या 1 कोटी 15 लाख रुपये खर्च करून मुला- मुलींच्या निवारासाठी 4400 चौरस फुटांचे दोन हॉल आज उपलब्ध झाले. तसेच या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होत असताना सभागृहाचे लोकार्पण माझ्या हस्ते झाले यामुळे मला विशेष आनंद होत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकच्या सायकलपटूंनी रॅलीतून दिला 'माझा भारत - माझं मत'चा संदेश

आज या संस्थेमध्ये जवळपास 55 मुले-मुली वास्तव्य करत आहेत. या मुलांसाठी वाढीव सुविधा देण्या संदर्भातला प्रस्ताव नव्याने सादर करावा. तसेच या संस्थेसाठी मुले व मुलींसाठी स्वतंत्र निवासी अधीक्षक देण्याबाबतचा प्रस्तावही लवकर पाठवण्यात यावा त्यावर शासन पातळीवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासनही आदिती तटकरे यांनी यावेळी दिले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: डा‍क विभागाची 2 फेब्रुवारीला पेन्शन अदालत; निवृत्तीवेतनधारकांनी 28 जानेवारीपर्यंत करावेत अर्ज

निरीक्षण व बालगृहाचे मंत्री तटकरे यांनी केले कौतुक:

मुला मुलींच्या निवाऱ्यासाठी नव्याने उभारण्यात आलेले सभागृहाचे काम अतिशय दर्जेदार असून अपेक्षेपेक्षा जास्तीत जास्त सोयी सुविधा देण्याचे काम संस्थेचे मानद सचिवांनी केलेले आहे. या संस्थेच्या निरीक्षणातून असे लक्षात आले की, ही संस्था येथील मुला मुलींना घरासारखे वातावरण देऊन त्यांच्यावर चांगले संस्कार करत असल्याची भावनाही महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790