मुंबई। दि. २५ ऑक्टोबर २०२५: अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारपट्टीवर शनिवार व रविवार असे दोन दिवस पावसाचा अंदाज असतानाच हवामानातील बदलामुळे राज्याच्या काही भागातही अवकाळी पावसाची शक्यता आहे.
नाशिक जिल्ह्यात दि. २६ पर्यंत यलो अलर्ट देण्यात आला असून, घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, मनमाड, चांदवड, सटाणा तालुक्यात पावसाने शुक्रवारी दमदार हजेरी लावली. एक तास पाऊस कोसळत होता.
पूर्व मध्य अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता आहे. येत्या पाच दिवसांत त्याचे उत्तर आणि ईशान्यकडे मार्गक्रमण होऊ शकते. त्यामुळे राज्यात पाऊस होईल अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
कोणत्या दिवशी कोणत्या जिल्ह्यात यलो अलर्ट ?:
२५ ऑक्टोबर : नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर.
२६ ऑक्टोबर : मुंबई, नाशिक, खान्देश, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड.
२७ ऑक्टोबर : धुळे, मुंबई, नाशिक, खान्देश, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर.
२८ ऑक्टोबर : पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, रायगड, रत्नागिरी आणि नांदेड
![]()

