नाशिक। दि. ८ सप्टेंबर २०२५: नाशिक शहरात गतवर्षापेक्षा यंदा ७ सप्टेंबरपर्यंत १०८ मिलीमीटर अधिक पर्जन्यमान झाले आहे. सलग चार दिवसांपासून शहरात जोरदार पाऊस झाला. रविवारीही सकाळपासून पावसाने सुरुवात केली होती, मात्र दुपारनंतर रिमझिम पाऊस सुरू होता. हवामान केंद्रात ४.० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.
आगामी चार ते पाच दिवस म्हणजे ११ सप्टेंबरपर्यंत पाऊस उघडीप देणार असल्याचे हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले. नाशिक, धुळे, नंदुरबार, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यांत ११ सप्टेंबरपर्यंत पावसाची उघडीप राहाणार आहे.
इतर जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. १२ सप्टेंबरपासून पुन्हा नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचे खुळे यांनी सांगितले.
![]()

