नाशिक। दि. २३ जून २०२५: राज्यातील काही भागांत पावसाने मागील तीन दिवसांत जोरदार हजेरी लावली आहे. आज 23 जून रोजी कोकणातील रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे, तर मुंबई ठाणे आणि पालघरमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूरात मुसळधार पाऊस पडला असून आज पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथा परिसरात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.. तर शेतकऱ्यांना पेरणीबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
तर नाशिक आणि आहिल्यानगरमध्ये तुरळ पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याशिवाय काही भागांत पावसाच्या जोरदार सरी कोसळणार असून वादळी वारे वाहू लागतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर आणि धाराशीवमध्ये पावसाच्या हलक्या सरींसह ढगाळ वातावरण रहील, असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
विदर्भातील नागपूर, चंद्रपूर येथे अमरावती आणि अकोल्यात काही काही प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. नागपूर आणि चंद्रपूरमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस थैमान घालणार असून या दोन जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
![]()

