नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): राज्याच्या अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुणे, मुंबईसह अनेक भागात पावसाने नागरीकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. हा पाऊस मान्सूनचा नसून पूर्व मॉन्सून असल्याचा हवामान खात्याचा दावा आहे. तर आजही राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडटांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आहे.
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. .मध्य महाराष्ट्रासह दक्षिण कोकणात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर आज जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छ. संभाजीनगर, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्येही हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) प्रवेशद्वारावर महाराष्ट्राच्या असलेल्या गोव्यात दाखल झाले असतानाच महाराष्ट्रावर बुधवारी (ता. ५) वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी पडतील, असा अंदाज हवामान खात्याने मंगळवारी व्यक्त केला.
त्यासाठी व महाराष्ट्राला हवामान खात्याने ‘येलो अलर्ट’ दिला आहे.मुंबई, मुंबई उपनगर, पालघर,जळगाव, धुळे आणि नंदूरबार हे जिल्हे वगळता संपूर्ण राज्यात हवामान खात्याने वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे. पूर्व मोसमी पावसाला पोषक हवामान, ढगाळ आकाश यामुळे कमाल तापमानात वेगाने घट होऊ लागली आहे. विदर्भ वगळता बहुतांश महाराष्ट्रात कमाल तापमान ४० अंशांच्या खाली घसरले आहे. राज्यात मंगळवारी जळगाव येथे ४१.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली