नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): मुंबई व कोकण वगळता नाशिकसह राज्यातील इतर भागात ५ जूनपर्यंत मान्सूनपूर्व पाऊस पडेल, असा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तवला असून यलो अलर्ट जाहीर केला आहे.
कोकणात आगामी दोन दिवस उष्ण व दमट वातावरण राहील. दरम्यान, केरळसह तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात मान्सून दाखल झाला असून आगामी वाटचालीसाठी अनुकूल वातावरण आहे.
राज्यात कोकण वगळता अन्य ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण तयार झाले असून पावसाला अनुकूल वातावरण तयार झाले आहे.
नाशिक, जळगाव, नंदुरबारसह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, लातूर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पावसासोबत ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. रविवारी विदर्भातील बुलडाणा जिल्हा वगळता अन्य ठिकाणी उन्हाची तीव्रता कायम राहून तापमान ४० ते ४४ अंश सेल्सियसच्या दरम्यान होते.