राज्यातील विधानसभा निवडणूक केव्हा जाहीर होणार याची सर्वच राजकीय पक्षांना उत्सुकता लागली होती. अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे बिगुल वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आज घोषणा केली आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. तर निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर 2024 रोजी लागणार आहे.
यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि खूप खूप आभार. दोन्ही राज्याच्या लोकांनी जो उत्साह दाखवला आहे. तो कायमस्वरुपी लक्षात राहील. महाराष्ट्रात एकूण 288 मतदारसंघ आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. महाराष्ट्रात 1 लाख 158 मतदार निवडणूक केंद्र आहेत. यापैकी शहरी भागात 42 हजार 604 तर ग्रामीण भागात 57 हजार 582 केंद्र आहेत.
उत्तर महाराष्ट्रातील निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे:
👉 निवडणुकीचं नोटिफिकेशन: 22 ऑक्टोबर 2024
👉 अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख: 29 ऑक्टोबर
👉 अर्जांची तपासणी: 30 ऑक्टोबर 2024
👉 अर्ज मागं घेण्याची तारीख: 4 नोव्हेंबर
👉 मतदान: 20 नोव्हेंबर 2024
👉 मतमोजणी: 23 नोव्हेंबर 2024
👉 निवडणूक प्रक्रिया समाप्त: 25 नोव्हेंबर 2024
288 जागांसाठी किती मतदार असतील? :
👉 एकूण मतदार: 9 कोटी 63 लाख
👉 नव मतदार: 20.93 लाख
👉 पुरूष मतदार: 4.97 कोटी
👉 महिला मतदार: 4.66 कोटी
👉 युवा मतदार: 1.85 कोटी
👉 तृतीयपंथी मतदार: 56 हजारांहून जास्त
👉 85 वर्षावरील मतदार: 12. 48 लाख
👉 शंभरी ओलांडलेले मतदार: 49 हजारांहून जास्त
👉 दिव्यांग मतदार: 6.32 लाख
महाराष्ट्रात किती मतदान केंद्र असणार ?:
👉 एकूण मतदान केंद्र: 1 लाख 186
👉 शहरी मतदार केंद्र: 42,604
👉 ग्रामीण मतदार केंद्र: 57,582
👉 एका मतदान केंद्रावर सरासरी मतदार: 960