⚡राज्यात सोमवारपर्यंत थंडीचा कडाका

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): उत्तर भारतातील बर्फवृष्टी व धुक्याचे प्रमाण काही अंशी कमी झाले आहे. मात्र तेथून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात सोमवारपर्यंत थंडीची तीव्रता कायम राहील, असा अंदाज इगतपुरी हवामान केंद्राने वर्तवला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये संततधार पाऊस, गंगापूर धरणातून ३,०९९ क्यूसेक विसर्ग

तीन दिवस पूर्ण कोरडे हवामान असेल, राज्यातील बहुतांश शहरांमध्ये किमान सरासरी तापमान १५ अंशांपर्यंत राहील. सोमवारनंतर मात्र पुन्हा तीन दिवस ढगाळ हवामान असेल. बेमोसमी पर्जन्यवृष्टीची मात्र शक्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यादरम्यान वाऱ्याचा वेगदेखील ६ ते १२ किलोमीटर प्रतितास इतका असेल. आर्द्रता २५ ते ४० टक्के असेल. त्यामुळे अचानक हवामानात बदल होण्याचे संकेत नसल्याचा अंदाज आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790