🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

राज्यात ढगाळ वातावरणामुळे गारठा कमी, पण ‘या’ भागांत थंडीचा कडाका वाढणार

नाशिक (प्रतिनिधी): राज्यात ढगाळ हवामान झाल्याने गारठा कमी झाला आहे. धुके आणि ढगाळ हवामान पुढील काही दिवस राहणार आह. तर पुढील काही काही दिवस किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर थंड वाऱ्याचा जोर जास्त राहिल्यास उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भात किमान थंडी वाढण्याची शक्यता आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: बिल्डर नरेश कारडांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

श्रीलंका आणि भारत दरम्यान असलेल्या कोमोरिन भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तर भारतात १०० नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत वाहत आहेत. त्यामुळे थंडी कमी-अधिक होत असून, दाट धुक्याचे साम्राज्य कायम आहे.

सोमवारी (ता. १३) पंजाबच्या अमृतसरमध्ये देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेले काही राज्याच्या बऱ्याच भागात सकाळी उशिरापर्यंत धुके पाहायला मिळत आहे.यातच अंशतः ढगाळ हवामानामुळे झाल्याने गारठा कमी झाला आहे. सोमवारी (ता. १३) धुळे ८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात किमान तापमान १३ अंशांच्या पुढे गेले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पोलीस असल्याची बतावणी करत नागरिकांना लुटणाऱ्या इराणीला अटक; १८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत !

सोमवारी सकाळपर्यंच्या २४ तासांत सोलापूर येथे ३२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. १४) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अंशतः ढगाळ हवामानाचा अंदाज आहे. किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. मात्र उद्यापासून (ता. १५) तीन दिवस किमान तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मुलगी झाल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ; सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा

हिमालयात बुधवारपासून (१५ जानेवारी) पश्चिमी विक्षोप (थंड वाऱ्याचा झंझावात) सक्रीय होण्याचा अंदाज आहे. यामुळे उत्तर भारतात पुन्हा थंडीत वाढ होण्याचा अंदाज आहे. थंड वाऱ्याचा जास्त वाहिल्यास उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भात किमान पारा खाली जाण्याचा अंदाज आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790