उद्यापासून ३ दिवस जोर ओसरणार; खान्देश मात्र अपवाद
नाशिक (प्रतिनिधी): राज्यात नाशिकसह धुळे, नंदुरबार, पालघर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शुक्रवारी (दि.२७) अतिजोरदार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
नाशिकसह पालघर, रत्नागिरी, वर्धा जिल्ह्यात गुरुवारी (दि.२६) जोरदार पाऊस झाला. शुक्रवारी (दि.२७) कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये जोरदार, मुंबईत मध्यम, नगर, जळगावमध्ये हलका ते मध्यम, पुणे, साताऱ्यात जोरदार तर विदर्भात केवळ ढगाळ वातावरण राहील. मराठवाड्यात संभाजीनगर वगळता हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
⚡ नाशिकसाठी पाऊस कसा हे असे समजून घ्या:
👉 नाशिक शहरामध्ये गुरुवारी ३२ तर जिल्ह्यात २४ मिलिमीटर पाऊस.
👉 गंगापूर धरण ९९.१३ टक्के भरले. ५६३० दलघफू पाण्याचा साठा.
👉 जिल्ह्यात २६ सप्टेंबरपर्यंत ८८१.५ मिमी. सरासरीपेक्षा २७.८ मिमी कमी पाऊस. गतवर्षी आतापर्यंत ६०७.१ मिमी पाऊस.
👉 अतिजोरदार पाऊस म्हणजे दिवसभरात ६४.५ ते २०४.४ मिमीपर्यंत पावसाचा अंदाज
👉 शनिवारपासून (दि.२८) तीन दिवस ओसरणार पावसाचा जोर.
👉 मध्य महाराष्ट्रात वाऱ्याची चक्रीय स्थिती व हवेच्या कमी दाबामुळे तूर्त पावसाचा जोर.