‘फास्टॅग’चा वार्षिक पास २.५% ने वाढला

नवी दिल्ली। दि. १६ मार्च २०२६: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) फास्टॅगच्या वार्षिक पासच्या शुल्कात २.५ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ३,००० रुपये असलेले वार्षिक शुल्क वाढून ३,०७५ रुपये होणार असून, ही नवी दररचना १ एप्रिल २०२६ पासून लागू होणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील भाविकांच्या बसला कानपूरजवळ अपघात; एकाचा मृत्यू

दरवाढ मर्यादित असल्याने नियमितपणे महामार्गाचा वापर करणाऱ्या वाहनधारकांना या पासमुळे मिळणारा आर्थिक फायदा मोठ्या प्रमाणात कायम राहणार आहे. शुल्कात केवळ ७५ रुपयांची वाढ झाल्याने वारंवार प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एका फेरीचा खर्च अंदाजे १५ रुपयांच्या आसपास राहणार असून, तो नियमित टोलदरांच्या तुलनेत कमीच आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक-त्र्यंबक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

५६ लाखांहून अधिक वापरकर्त्यांवर परिणाम:
देशभरात सध्या ५६ लाखांपेक्षा अधिक वाहनधारकांकडे फास्टॅगचा वार्षिक पास उपलब्ध आहे. महामार्गावरील एकूण कार व्यवहारांपैकी सुमारे २८ टक्के व्यवहार हे या पासच्या माध्यमातून होत असल्याची माहिती आहे.

वार्षिक पासची सुविधा काय?:
फास्टॅगचा वार्षिक पास कार, जीप आणि व्हॅनसारख्या हलक्या वाहनांसाठी उपलब्ध आहे. या पासद्वारे वाहनधारकांना वर्षभरात कमाल २०० वेळा टोल नाका ओलांडण्याची परवानगी मिळते. २०० प्रवास पूर्ण होईपर्यंत किंवा एक वर्षाचा कालावधी संपेपर्यंत हा पास वैध राहतो.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790