नाशिक: अभय योजनेच्या दुसऱ्या टप्प्यास 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (जिल्हा माहिती कार्यालय): राज्यात मुद्रांक शुल्क चुकविणाऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या अभय योजनेच्या दुसऱ्या टप्प्यास 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच ही मुदतवाढ देताना आता महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास महामंडळ (म्हाडा), शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), महानगरपालिका, नगरपंचायतीच्या जागांवर विकसित झालेल्या इमारतींमधील रहिवाशांनाही योजना लागू करण्याचाही निर्णय शासनाने जाहीर केला आहे, असे सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

राज्य शासनाने आतापर्यंत 1980 ते 2000 या दरम्यान चुकविलेला मुद्रांक शुल्क भरणाऱ्‍यांसाठी अभय योजना सन 2023 लागू करण्यात आली आहे. ही योजना 1 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 आणि 1 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 या दोन टप्प्यात राबविण्याचा शासनाने निर्णय घेतलेला होता.

31 मार्चनंतर पुन्हा या योजनेला 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर योजनेचा कालावधी 30 जूनला संपुष्टात आल्याने राज्यशासनाने या योजनेला पुन्हा 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तरी या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या जमिनीवर वसलेल्या नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थेने निवासी किंवा अनिवासी युनिट्सबाबतचे पहिले वाटप पत्र किंवा शेअर सर्टिफिकेट किंवा स्टॅम्प नसलेल्या कागदावर किंवा लेटरहेडवर जारी केलेले किंवा अंमलात आणलेले करार, म्हाडा आणि तिची विभागीय मंडळे किंवा शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ ऑफ महाराष्ट्र लिमिटेड (सिडको) किंवा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) किंवा महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत किंवा विकास किंवा नियोजन प्राधिकरणांनी मंजुर केलेले किंवा स्थापन केलेले यांना लागु राहील, असे ही दवंगे यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790