कमर्शियल एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, आजपासून नवे दर लागू

नवी दिल्ली। दि. १ ऑगस्ट २०२५: महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्य अन् व्यावसायिकांना महागाईपासून दिलासा मिळाला आहे. आजपासून (१ ऑगस्ट) देशात कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. १९ किलो वजनाता व्यवसायिक गॅसची किंमत आजपासून ३३.५० रूपयांनी कमी करण्यात आली आहे

कमर्शियल गॅस सिलिंडर रेस्टोरेंट्स, हॉटल्स, लग्न, ढाबे या ठिकाणी वापरण्यात येतो. दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. एप्रिल २०२५ मध्ये घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रूपयांनी वाढ करण्यात आली होती, त्यानंतर अद्याप दर जैसे थे आहेत.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहरातील सहायक पोलीस आयुक्तांची खांदेपालट

मागील चार महिन्यांत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाला. जुलै 2025 मध्ये गॅसच्या किंमतीत ३० रुपयांची कपात झाली होती. एप्रिल 2025 मध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत 6 रुपयांची वाढ झाली, दिल्लीत दर 1,803 रुपये झाले. मे मध्ये 19.50 रुपयांची कपात झाली, दर 1,783.50 रुपये झाले. जून मध्ये किंमतीत कोणताही बदल झाला नाही, दर स्थिर राहिले. जुलै मध्ये 30 रुपयांची घट झाली, दर 1,753.50 रुपये झाले. आता ऑगस्टमध्ये 33.50 रूपयांनी दर कमी झाले आहेत.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: सातपूर गोळीबारातील फरार शुभम निकम अखेर गजाआड

घरगुती सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल नाही:
घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 8 एप्रिल 2025 पासून आतापर्यंत स्थिर आहे. सरकारने यात कोणताही बदल केलेला नाही. गेल्या चार महिन्यांत किंमती ना वाढवण्यात आल्या ना कमी करण्यात आल्या.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here