LPG Gas Cylinder: पुन्हा दरात वाढ; 15 दिवसांत इतक्या रुपयांनी महागला गॅस सिलेंडर
नवी दिल्ली: वाढत्या महागाईमध्ये सामान्य जनतेला आणखी एक झ’ट’का बसला आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. 15 दिवसांत विना सब्सिडी एलपीजी सिलेंडर 50 रुपयांनी महागला (LPG cylinder Price Hike) आहे. आज 1 सप्टेंबर रोजी एलपीजी सिलेंडरमध्ये 25 रुपयांची वाढ झाली आहे. याआधी पेट्रोलियम कंपन्यानी 18 ऑगस्ट रोजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ केली होती.
दिल्लीत आता 14.2 किलोग्रॅमच्या विना सब्सिडी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर दिल्लीत 14.2 किलोग्रॅमच्या LPG Cylinder चा दर 884.50 रुपये इतका झाला आहे. 14.2 किलोग्रॅम असणाऱ्या नॉन सबसिडी एलपीजी गॅस सिलेंडरसाठी (non-subsidized LPG) आणखी 25 रुपये भरावे लागणार आहेत. या किंमती आजपासून लागू होणार आहेत. वाढत्या किंमतीसह दिल्लीत आता घरगुती गॅस सिंलेडर 859 वरून 884 रुपये इतका झाला आहे.
दिल्लीत गॅस सिलेंडरचा नवा दर 884.5 रुपये, मुंबईमध्ये गॅस सिंलेडर दर 884.5 रुपये, कोलकातामध्ये 911 रुपये, चेन्नईत 900.5 रुपये. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या होत्या. मे आणि जूनमध्ये सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. एप्रिलमध्ये सिलेंडरच्या दरात 10 रुपयांची कपात करण्यात आली होती.
दिल्लीत यावर्षात जानेवारीमध्ये LPG Cylinder चा दर 694 रुपये होता, तो फेब्रुवारीमध्ये वाढून 719 रुपये इतका झाला. त्यानंतर 15 फेब्रुवारीला पुन्हा एकदा दर वाढवण्यात आल्याने सिलेंडरची किंमत 769 रुपये झाली. त्यानंतर फेब्रुवारीमध्येच पुन्हा दुसऱ्यांदा वाढ झाली. 25 फेब्रुवारीला एलपीजी सिलेंडर 794 रुपये झाला. मार्चमध्ये दर वाढून 819 रुपये इतका झाला.