नाशिक(प्रतिनिधी): नाशिक शहरात 8 मे पासून मद्यविक्रीला सुरुवात होणार आहे. मात्र 4 मे रोजी ग्राहकांची जी झुंबड उडाली आणि व्यवस्थापनाचा जो फज्जा उडाला तो यावेळी होऊ नये म्हणून वेगळ्या प्रकारचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. या थेट विक्री न करता दुकानदाराकडून प्रत्येक ग्राहकाला वेळ सुनिश्चित करून दिली जाईल, त्याच वेळेत खरेदी करता येईल.
नवीन योजनेनुसार प्रत्येक मद्यविक्रेत्याने दुकानाच्या दर्शनी भागात बोर्डवर मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. त्या मोबाईल क्रमांकावर ग्राहकाने SMS अथवा व्होट्सअप द्वारे मद्य खरेदीसाठीची मागणी दुकानदाराला टाकायची आहे. त्यानंतर ग्राहकांना त्यांच्या मोबाईल नंबरवर SMS अथवा व्होट्सअप द्वारे त्यांच्या स्लॉटची तारीख आणि वेळ दुकानदारांकडून कळविण्यात येईल. त्यानुसार एका तासाच्या स्लॉटमध्ये 50 ग्राहकांना विक्री करण्यात येईल. सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत दुकानं सुरु असतील. प्रत्येकी एका तासाच्या स्लॉटमध्ये 50 ग्राहकांना दोन रांगांमध्ये 6 फुटाचे अंतर ठेऊन उभे राहायचे आहे. आदेशांचा भंग झाल्यास संबधितांवर कारवाई होऊ शकते.