नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): भारत सरकारने नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ संसदेत मांडला. त्यानिमित्ताने लघु उद्योग भारती नाशिक शाखेतर्फे प्रतिवर्षीप्रमाणे केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रसिध्द व जेष्ठ अर्थतज्ञ डॉ. विनायकराव गोविलकर यांचे विश्लेषणात्मक व्याख्यान निवेक, सातपुर, नाशिक येथे २६ जुलै २०२४ रोजी सायं. ५ वा. आयोजित केले आहे.
अर्थसंकल्पातील तरतूदींमुळे आयकर, जीएसटी, व्यवसायकर, आयात निर्यात या बरोबर सूक्ष्म, लघु व माध्यम उद्योगांवर होणारे परिणाम इ. महत्वांच्या मुद्द्यावर सविस्तर विवेचन डॉ. गोविलकर करणार आहेत. ह्या उद्बोधनपर व्याख्यानाचा लाभ MSME उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी यांनी घ्यावा असे आवाहन लघु उद्योग भारती’ नाशिक शाखेतर्फे करण्यात येत आहे.
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790