LPG

लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? जाणून घ्या सविस्तर…

मुंबई (प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना अखेर आजपासून फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत. लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्याच्या वितरणासाठी अर्थ विभागाकडून महिला व बालविकास विभागाला निधी वर्ग करण्यात आला आहे. महिला व बालविकास विभागाकडून दोन दिवसांपूर्वी तांत्रिक कारणामुळं हप्ता वितरीत करण्यात उशीर झाल्याचं सांगण्यात आलं होतं. आता आजपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांना 1500 रुपये मिळतील. मात्र फेब्रुवारी महिन्यात लाडक्या बहिणींची संख्या घटणार असल्याचा अंदाज आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये आजपासून (दि. १२ मार्च) ‘कृषी कुंभ’ प्रदर्शन

अर्थ विभागाकडून महिला व बाल विकास विभागाला निधी वर्ग:
फेब्रुवारी महिन्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योनजेच्या वितरणासाठी निधी अर्थ विभागाकडून देण्यात आला आहे. महिला व बाल विकास विभागाकडून हप्त्याची रक्कम वर्ग करण्यात येईल. फेब्रुवारी महिना संपण्यास अवघे दोन दिवस बाकी असताना हा हप्ता वर्ग करण्यास सुरुवात होणार आहे.

लाडकी बहीण योजनेचे निकष होते त्याची कठोर अंमलबजावणी करण्यात येत असल्यानं महिला लाभार्थ्यांच्या संख्येत घट झाली आहे.  डिसेंबर महिन्यात ज्या राज्य शासनानं  2 कोटी 46 लाख महिलांच्या खात्यात रक्कम पाठवण्यात आली होती. त्यानंतर जानेवारी महिन्याचा विचार केला असता त्या महिन्यात 2 कोटी  41 लाख महिलांना लाभ देण्यात आला. म्हणजेच जानेवारी महिन्यात 5 लाख महिलांची संख्या घटली होती. त्यानंतर महिला व बाल विकास विभागानं केलेल्या पडताळणी प्रक्रियेत लाभार्थी महिलांची संख्या आणखी 4 लाखांनी घटल्याची माहिती आहे. त्यामुळं साधारणपणे 2 कोटी  37 लाख महिलांना फेब्रुवारी महिन्याचे  1500 रुपये मिळतील.

🔎 हे वाचलं का?:  देवळाली रिंग रोडसाठी भूसंपादन; शेतकऱ्यांना योग्य मोबदल्याबाबत शासनाचा सहानुभूतीपूर्वक विचार- मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

लाडक्या बहिणींची संख्या का घटतेय?:
लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर महायुती सरकारनं मध्य प्रदेशात सुरु असलेल्या लाडली बहेना या योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेची निवडणुकीपूर्वी अंमलबजावणी सुरु करायची असल्यानं पहिल्यांदा अधिक महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये अर्ज भरुन घेऊन लाभार्थींची संख्या वाढवण्यावर दिला गेला. यामुळं पडताळणी न करता अर्ज भरुन घेतले गेले आणि महिलांना लाभाची रक्कम दिली गेली. राज्य सरकारनं जवळपास सहा हप्त्यांती रक्कम महिलांच्या खात्यात जमा केली. राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा आल्यानंतर लाभार्थ्यांची पडताळणी सुरु झाली. त्यामधून लाभार्थी संख्या कमी होण्यास सुरुवात झाली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790