नाशिक। दि. १२ डिसेंबर २०२५: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र महिलांकडून ई-केवायसी करतांना काही चुका झाल्या असतील अशा महिलांसाठी ई-केवायसी पूर्ततेसाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या वेब पोर्टलवर अंतिम संधी देण्यात आली आहे.
पात्र महिलांनी विहित मुदतीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाने यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत ज्या पात्र महिलांचे वडिल किंवा पती हयात नाहीत किंवा ज्यांचा घटस्फोट झाला आहे, अशा लाभार्थी महिलांनी ई-केवायसी स्वत: ऑनलाईन पोर्टलवर पूर्ण करून वडील/पती यांचे अधिकृत मृत्यु प्रमाणपत्र, घटस्फोटीत असल्याचे न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत ऑफलाईन पद्धतीने जवळच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31 डिसेंबर 2025 पर्यंत जमा करण्याचे आवाहनही श्री. दुसाने यांनी केले आहे.
![]()
