🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

लाडकी बहीण योजना: सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार.. जाणून घ्या सविस्तर…

मुंबई। दि. १० ऑक्टोबर २०२५: महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. सप्टेंबर महिन्याच्या लाभाचं वितरण आजपासून सुरु करण्यात येईल.

येत्या दोन ते तीन दिवसात पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात सप्टेंबर महिन्याच्या सन्मान निधीची रक्कम जमा होईल, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. आदिती तटकरे यांनी सर्व लाभार्थी महिलांनी दोन महिन्यांच्या कालावधीत ई-केवायसी प्रक्रिया देखील पूर्ण करुन घेण्याचं आवाहन केलं आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मुलगी झाल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ; सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्या पासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरातील विविध वाहतूक मार्गात बदल

आदिती तटकरे पुढं म्हणाल्या, महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील २ महिन्यांच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती, असं आदित तटकरे यांनी म्हटलं.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790