नाशिक: सिडकोत धाडसी घरफोडी; २५ तोळे दागिने लंपास

नाशिक (प्रतिनिधी): अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत माऊली लॉन्स ते केवल पार्क कडे जाणाऱ्या रस्त्यावरील गुरुकृपा बंगल्यात मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या घरफोडीत 25 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह एक किलो चांदी असा चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. सिताराम श्यामलाल शर्मा (वय 59) यांच्या मालकीचा केवल पार्क रोडवर गुरुकृपा बंगला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकला आज (दि. १९) पावसाचा ‘यलो अलर्ट’; तापमानात घट, हवामानात बदल

ते बाहेरगावी गेले असताना रविवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास चारचाकी तुन आलेल्या अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा तसेच सेफ्टी गेट कडी कोंडा तोडून आत प्रवेश केला.

लोखंडी कपाटात असलेल्या सोन्याच्या बांगड्या चैन अंगठी मंगळसूत्र असे २५ ते २६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, तसेच एक किलो वजनाचे चांदीचे विविध दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी घरफोडी करून चोरून नेला आहे. रविवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास शर्मा यांच्या घरात काम करणारी महिला आल्याने त्यांनी हा प्रकार बघितला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घरफोडीचा पंचनामा करून सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: भरदिवसा घरफोडीत ६.७४ लाखांचा ऐवज लांबवला

सदर घरफोडी करणारे चोरटे हे चारचाकी कारमधून आल्याचे सीसीटीव्हीत चित्रित झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्यासह अंबड पोलीस ठाण्याचे पथक दाखल होत सीसीटीव्हीच्या द्वारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790