नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): कसारा घाटात विचित्र अपघात झाला असून एका कंटेनरने 6 ते 7 वाहनांना धडक दिल्याची माहिती मिळत आहे. या भीषण अपघातात सुमारे 13 ते 14 प्रवासी जखमी झाल्याचे समजते.

नाशिक मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात रविवार (ता. १४ रोजी) भीषण अपघातात १३ ते १४ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कसारा घाटातील ब्रेकफेल पाँईट जवळ एका कंटेनर ने सहा ते सात गाड्यांना भीषण धडक दिली. या धडकेत गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या अपघातात १३ ते १४ प्रवासी जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनास्थळावर महामार्ग पोलीस रूट पेट्रोलिंग टीम व रुग्णवाहिका रवाना झाली असुन आज वीकेंडमुळे कसारा घाटामध्ये वाहनांची गर्दी होतांना दिसत आहे.
दरम्यान, शनिवारी सायंकाळी कसारा घाटात दरड कोसळली होती. सुदैवाने यात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. दरड कोसळल्याचा मेसेज हेल्पलाईनला गेल्यावर रूट पेट्रोलिंग टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर दरड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली होती.
सविस्तर बातमी लवकरच…