नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.
त्यांना न्यायालयाने दर रविवारी पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश दिले. नाशिकमधील व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीवरून कारडा यांच्याविरोधात मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात ३० ऑक्टोबरला संशयित कारडा यांना आर्थिक गुन्हेशाखेच्या पथकाने अटक केली होती.
त्यानंतर उपनगर पोलिसांत ५ नोव्हेंबरला जळगावातील व्यावसायिकाने कारडा यांच्याविरोधात चार कोटी रुपयांच्या अपहाराची फिर्याद दिली होती.
बुधवारी (ता. ८) कारडा यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. कारडा मध्यवर्ती कारागृहात असताना त्यांच्यावर गुरुवारी (ता. ९) तिसरा गुन्हा उपनगर पोलिसांत दाखल झाला.
त्यामध्ये नाशिक रोड परिसरातील महिलेने फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (ता.१०) खासगी वकील राहुल कासलीवाल यांनी कारडा यांचा जामीन अर्ज न्यायालयात सादर केला. त्यानुसार न्यायालयाने अटी-शर्तींनुसार जामीन मंजूर केला.