एजन्टला एक रुपया न देता दोन मिनिटात बुक करा रेल्वेचे तत्काळ तिकीट, पाहा सोप्या ट्रिक्स

राज्यातील शाळा १५ जूनला सुरू होणार आहेत. अनेक जण गावी गेले आहेत. तुम्हाला जर रेल्वेने प्रवास करायचा असेल तर तुम्ही एजन्टला एक रुपया न देता अवघ्या २ मिनिटात रेल्वेचे तत्काळ तिकीट बुक करू शकता.

यासाठी तुम्हाला जास्त कष्ट करण्याची गरज नाही. या ठिकाणी आम्ही तुम्हाला खूपच सोप्या टिप्स देत आहोत. जाणून घ्या डिटेल्स.

तात्काळ रेल्वे तिकीट बुक करावे लागणार आहे. तिकीट बुक करण्यासाठी अनेक डिटेल्स भरावे लागत असतात.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

यात खूप वेळ निघून जातो. तरीही तुम्हाला तत्काळ तिकीट मिळत नाही. परंतु, जर तुम्ही मास्टर लिस्ट आधीच बनवून ठेवल्यास तुम्हाला हे सोपे जाऊ शकते. मास्टर लिस्टमध्ये पॅसेंजरची सर्व डिटेल्स उपलब्ध असते. एका क्लिकमध्ये हे भरते.

कसे बनवाल मास्टर लिस्ट:

  • सर्वात आधी तुम्हाला IRCTC पोर्टल वर जावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला या वेबसाइटवर आपला आयडी पासवर्ड द्वारे लॉगइन करावे लागेल.
  • लॉगइन केल्यानंतर तुम्हाला My Account वर जावे लागेल. यानंतर My Profile वर जावे लागेल.
  • या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन मिळेल. जो Add/Modify Master List असेल.
  • यानंतर तुमच्याकडे पॅसेंजरची डिटेल्स मागितली जाईल. ज्यात नाव, जन्म तारीख, जन्म ठिकाण, फूड चॉइस आणि आयडी कार्ड नंबर टाकावा लागेल.
  • डिटेल्स कन्फर्म केल्यानंतर Submit वर क्लिक करावे लागेल.
हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

कसा कराल मास्टर लिस्टचा वापर:
यानंतर तुम्हाला ज्यावेळी रेल्वेचे तिकीट बुक करायचे असेल प्रवाशाची डिटेल्स मागितली जाईल त्यावेळी मास्टर लिस्टमधील ऑप्शनवर टॅप करावे लागेल. नंतर पॅसेंजरला अॅड करा. इतके केल्यानंतर तुमचे काम होईल. यानंतर सहज रेल्वेचे तात्काळ तिकीट बुक करता येईल.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790