नाशिकला प्रमुख बांधकाम व्यावसायिकांकडे इन्कम टॅक्स विभागाचे छापे
नाशिक (प्रतिनिधी): आयकर विभागाने नाशिकमध्ये बांधकाम व्यवसायिकांच्या कार्यालयात छापे टाकल्याची माहिती मिळत आहे. आयकर विभागाच्या विविध पथकाने हे छापे टाकले आहेत. शहरात एकाचवेळी १० हून अधिक बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाने छापे टाकल्याने खळबळ उडाली आहे..
आयकर विभागाच्या तीन ते चार टीम सकाळपासून नाशिकमध्ये दाखल झाल्या आहेत. नाशिकमध्ये आयकर विभागाने ८ ते १० बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयात छापे टाकल्याचे समजते.
नाशिकच्या मेनरोडवर तसेच, या बांधकाम व्यावसायिकांची निवासस्थाने, कार्यालय, त्यांच्या मॅनेजरसह महत्त्वाच्या व्यक्तींची निवासस्थाने याठिकाणी आयकरचे पथक दाखल झाले आहेत. या छाप्यांमध्ये नामांकीत बांधकाम व्यावसायिकांचा समावेश आहे. त्यामुळे आयकर विभागाच्या हाती मोठे घबाड लागण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
अधिकारी नाशिक, मुंबई, पुणे, संभाजीनगर येथील असल्याचे समजते. या छाप्यांमुळे नाशिकच्या बांधकाम व्यायसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या छापेमारीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आज सायंकाळपर्यंत या छाप्यांबाबत अधिकृत माहती मिळण्याची शक्यता आहे.