नाशिक, दि. २८ मे २०२५: केंद्र सरकारच्या सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस म्हणजेच प्रत्यक्ष कर विभागाने येत्या ३१ मार्च २०२५ रोजीचे आयकर विवरणपत्र भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी (म्हणजेच मूल्यांकन वर्ष २०२५-२६) आयकर विवरण पत्रक भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२५ होती, त्याऐवजी आता दि. १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत करदात्यांना त्यांची विवरण पत्रके दाखल करता येऊ शकतील.
आयकर आकारणी वर्ष २०१५-२६ साठी (आर्थिक वर्ष २४-२५) आयकर विभागाने नवीन आयकर फॉर्म्सचे नमुने जाहीर केले होते, त्यात मोठे बदल केले गेले होते. या बदलांमुळे फॉर्म्स अधिक पारदर्शक, सुलभ व अचूक माहिती भरण्यायोग्य झाले असल्याचे जरी आयकर विभागाकडून सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात फायलिंग युटिलिटी उपलब्ध झालेली नसल्याची अडचण आहे.
बदललेल्या प्रणालीनुसार करदात्यांना योग्य तयारी करता यावी यासाठी असा अतिरिक्त वेळ दिलेला असल्याचे नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असो.चे अध्यक्ष नितीन डोंगरे यांनी व्यक्त केले.
![]()

