नाशिक (प्रतिनिधी) : शहरात बेकायदेशीररित्या हुक्का ओढला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, छापा टाकला असता, चांदशी परिसरातील सेक हॉटेलमध्ये २३ ग्राहक, हॉटेल मालक, व्यवस्थापक व ३ वेटर यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
तालुका पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, चांदशी, दरी व मातोरी परिसरात असलेल्या हॉटेल्समध्ये हुक्का व अवैध मद्यविक्री केली जात असल्याचे कळले. या संदर्भात स्थानिक नागरिकांकडून देखील पोलीस अधीक्षक पाटील यांच्याकडे तक्रारी आल्या. यानंतर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार, विशेष पथकाने मंगळवारी (दि.५ जानेवारी) रोजी रात्री एका हॉटेलवर छापा टाकला. दरम्यान, एका खोलीत ग्राहक हुक्का पितांना आढळून आले. यानंतर, हॉटेल मालक शिवराज वावरे, व्यवस्थापक सचिन सांगळे, ३ वेटर यांना ताब्यात घेऊन, यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर तंबाखूजन्य पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत.