राज्यपाल रमेश बैस शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): राज्यपाल रमेश बैस येत्या शुक्रवारी (ता १२) नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्या अनुषंगाने सर्व प्रशासकीय यंत्रणांनी तयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.

महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी जितीन रहमान, उपवनसंरक्षक (पूर्व) उमेश वावरे, उपवनसंरक्षक (पश्चिम) पंकज गर्ग, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, तहसीलदार (महसूल) परमेश्वर कासुळे, दिंडोरी तहसीलदार पंकज पवार, येवला तहसीलदार शरद घोरपडे, त्र्यंबकेश्वर तहसीलदार श्वेता संचेती आदी उपस्थित होते.

हे ही वाचा:  नाशिक: खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जण जखमी

जिल्हाधिकारी म्हणाले, की नियोजित हेलिपॅड, शासकीय विश्रामगृह व दौरा याठिकाणी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात यावी.

वाहतूक व्यवस्थेचेही सुयोग्य नियोजन करावे, त्याचप्रमाणे राज्यपालांच्या ताफ्यातील वाहनांची ‘आरटीओ’कडून तपासणी करून ती सुस्थितीत असल्याची खात्री करावी, शासकीय विश्रामगृह, आरोग्य विज्ञान विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ या ठिकाणी राज्यपालांची भेट प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणीही सुरक्षा व इतर बाबींच्या व्यवस्थेबाबत संबंधित यंत्रणांनी काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.

हे ही वाचा:  नाशिक जिल्हा प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज; अशी आहे तयारी...

योजनांचा आढावा:
जिल्हाधिकारी म्हणाले, की राज्यपालांना पंतप्रधान आवास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, हर घर जल योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना, प्रधानमंत्री किसान योजना, कृषी योजना, शाळा इमारत, डीबीटी प्रदान लाभ योजना त्याचप्रमाणे जिल्ह्यातील आश्रमशाळा, अंगणवाडी यांचा आढावा घेणार असल्याने संबंधित विभागांनी माहिती सादर करावी.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790